Corona virus information in marathi

कोरोना व्हायरस हा नवीन असल्यामुळे अजून यावर संशोधन केले जात आहे परंतु संशोधनकर्ते आता यावर प्रतिबंधात्मक लस निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. 


कोरोना व्हायरसची सुरुवात 

चीनने 31 डिसेंबर 2019 रोजी वुहान सिटीमध्ये निमोनियाच्या आढळलेल्या घटनांविषयी जगाला सतर्क केले. चिंतेची बाबा तर ही होती की हा विषाणू इतर कोणत्याही विषाणूंच्या संलग्न नव्हता. जेव्हा एखादा नवीन विषाणू आढळून येतो तेव्हा तो लोकांना कसा प्रभावित करतो हे माहीत नसते. 


त्यानंतरच एका आठवड्यामध्ये म्हणजेच 7 जानेवारीला चीनमधील अधिकाऱ्यांनी असे सांगितले की एक virus स्पष्ट झाला आहे. तो नवीन वायरस म्हणजेच 'कोरोना' व्हायरस आहे. यामध्ये सामान्य सर्दी आणि SARS आणि MERS अशा जीवाणूंचा समावेश आहे. त्या नवीन विषाणूचे तात्पुरते नाव हे ‘2019-nCoV’ असे ठेवण्यात आले.

त्यानंतर WHO ( जागतिक आरोग्य संघटना ) ने चीन मधील अधिकाऱ्यांसोबत या वायरस वर काम करण्यासाठी सुरुवात केली. या वायरस चे लक्षणे काय आहेत? तो व्हायरस माणसांवर कसा प्रभाव करतो? आणि त्याच्यावर काय उपचार करण्यात येतील? या सर्व बाबींवर काम करण्यात आले.कोरोना व्हायरस हा कसा मनुष्यापर्यंत पोहोचला?

कोरोना व्हायरस हा दिवसेंदिवस वाढत चालला असल्यामुळे जगभरातील लोकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या व्हायरसवर मात करण्यासाठी अजून कोणताही उपाय मिळालेला नाही. वैज्ञानिक काही माहिती मिळते का याबाबत सतत संशोधन करत आहेत. वैज्ञानिकांच्या संशोधनातून असे स्पष्ट झाले आहे की हा व्हायरस सापांपासून किंवा वटवाघळापासून मनुष्यापर्यंत पोहोचला असावा. परंतु याबाबत खात्रीशीर माहिती अजून समोर आलेली नाही.

WHO ने कोरोना व्हायरस बाबत असे स्पष्ट केले आहे की हा व्हायरस प्राण्यांपासून मनुष्या पर्यंत पोहोचलेला आहे. MERS-COV हा उंटापासून उत्पन्न झाला व SARS-COV सिवेट कॅट पासून आला हे सिद्ध झाले आहे परंतु 2019-nCoV हा प्राण्यांपासूनच उत्पन्न झाला आहे परंतु कोणत्या प्राण्यापासून हे अजून स्पष्ट झालेले नाही.


कोरोना वायरस ची लक्षणे


 • खोकला येणे-  जर एखाद्या व्यक्तीला खूप खोकला असेल तर ते कोरुना वायरस चे लक्षण असू शकते.
 • डोकेदुखी- वारंवार डोके दुखणे किवा जड होणे. 
 • ताप येणे- रुग्णाला ताप येणे हे कोरोना व्हायरस चे प्राथमिक लक्षण आहे.
 • अस्वस्थ वाटणे- कोरोना व्हायरस ची बाधा असेल तर रुग्णाला नेहमी अस्वस्थ वाटते.
 • शिंका येणे- कोरोन व्हायरस चा श्र्वसणावर परिणाम होतो त्यामुळे शिंका येतात.
 • फुफ्फुसाला सूज येणे- फुफ्फुसाला सूज येणे हे ही कोरोना विषाणूचे महत्वाचे लक्षण आहे.


अशी लक्षणे जर आढळून आली तर त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधावा.

कोरोना व्हायरस पासून रक्षण करण्यासाठी कोणते उपाय कराल?


 • बाहेरून घरी आल्यावर आपले हात,पाय स्वच्छ साबणाने आणि कोमट पाण्याने धुवावे. 
 • घरातून बाहेर पडताना आपल्या तोंडाला मास्क लावूनच बाहेर पडावे.
 • आपण वापरलेला मास्क हा स्वच्छ असावा याची खात्री करून घ्यावी.
 • गर्दीच्या ठिकाणी शिंकताना किंवा खोकताना तोंडावर रुमाल धरावा.
 • खोकला आणि सर्दी असलेल्या व्यक्तीपासून दूर रहावे.
 • ताप, सर्दी किंवा खोकला असल्यास त्वरित डॉक्टरांकडून चिकित्सा करून घ्यावी.
 • सर्दी किंवा खोकल्यासाठी औषध घेताना डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.उपाययोजना

ज्या रुग्णांना कोरोना विषाणूची बाधा झाली आहे त्या रुग्णांवर एका स्वतंत्र खोलीमध्ये उपचार सुरू आहेत जेणेकरून कोरोना ची बाधा दुसऱ्या व्यक्तींना होणार नाही.

बाहेरील देशांमधून ये-जा करणाऱ्या प्रवाशांची वैद्यकीय तपासणी केली आहे. प्रवाशांना ताप आहे का नाही हे पाहण्यासाठी सर्व ठिकाणी थर्मल स्क्रीनचा वापर करण्यात आला आहे.

गर्दीच्या ठिकाणी शक्य तितकी स्वच्छता ठेवण्यात आलेली आहे. तसेच काही काळासाठी सी-फूड मार्केटही बंद ठेवण्यात आले आहे.

ह्या सर्व उपाययोजना चीनमध्येच नाही तर इतर अनेक देशांमध्ये ही करण्यात आलेल्या आहेत.

सध्याची कोरोना ग्रासितांची संख्या: 


देश किती रुग्ण अढळले
चीन
80422 रुग्ण
रिपब्लिक ऑफ कोरिया
 5328 रुग्ण
इटली
 2502 रुग्ण
इराण
 2336 रुग्ण
International conveyance
 706 रुग्ण
जपान
 287 रुग्ण
फ्रान्स
 212 रुग्ण
जर्मनी
196 रुग्ण
स्पेन
 151 रुग्ण
सिंगापूर
 110 रुग्ण
युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका
 108 रुग्ण
कुवैत
 56 रुग्ण
युनायटेड किंगडम
 51 रुग्ण
बहरीन
 49 रुग्ण
थायलंड
 43 रुग्ण
स्वित्झर्लंड
 37 रुग्ण
ऑस्ट्रेलिया
 33 रुग्ण
नॉर्वे
 32 रुग्ण
इराक
 31 रुग्ण
कॅनडा
 30 रुग्ण
मलेशिया
 29 रुग्ण
नेदरलँड्स
 28 रुग्ण
UAE
 27 रुग्ण
ऑस्ट्रिया
 24 रुग्ण
स्वीडन
 24 रुग्ण
आईसलँड
16 रुग्ण
व्हिएतनाम
 16 रुग्ण
लेबनॉन
 13 रुग्ण
इस्राईल
 12 रुग्ण
ओमान
 12 रुग्ण
क्रोएशिया
 9 रुग्ण
बेल्जियम
 8 रुग्ण
डेन्मार्क
8 रुग्ण
कतार
 8 रुग्ण
सॅन मरिनो
 8 रुग्ण
इक्वाडोर
 7 रुग्ण
फिनलँड
 7 रुग्ण
ग्रीस
 7 रुग्ण
भारत
28 रुग्ण
पाकिस्तान
6 रुग्ण
अल्जेरिया
 5 रुग्ण
Czech Republic
 5 रुग्ण
मेक्सिको
 5 रुग्ण
रोमानिया
 4 रुग्ण
अझरबैजान
 3 रुग्ण
जॉर्जिया
 3 रुग्ण
फिलिपिन्स
 3 रुग्ण
रशियन फेडरेशन
 3 रुग्ण
ब्राझील
 2 रुग्ण
इजिप्त
 2 रुग्ण
एस्टोनिया
 2 रुग्ण
इंडोनेशिया
2 रुग्ण
आयर्लंड
 2 रुग्ण
न्यूझीलंड
 2 रुग्ण
पोर्तुगाल
 2 रुग्ण
अफगाणिस्तान
 1 रुग्ण
अंडोरा
 1 रुग्ण
अर्जेंटिना
1 रुग्ण
आर्मेनिया
 1 रुग्ण
बेलारूस
 1 रुग्ण
कंबोडिया
 1 रुग्ण
चिली
 1 रुग्ण
डोमिनिकन रिपब्लिक
1 रुग्ण
जॉर्डन
 1 रुग्ण
लाटविया
 1 रुग्ण
लिथुआनिया
 1 रुग्ण
लक्समबर्ग
 1 रुग्ण
मोनाको
 1 रुग्ण
मोरोक्को
 1 रुग्ण
नेपाळ
 1 रुग्ण
नायजेरिया
 1 रुग्ण
उत्तर मॅसेडोनिया
 1 रुग्ण
सौदी अरेबिया
 1 रुग्ण
सेनेगल
 1 रुग्ण
श्रीलंका
 1 रुग्ण
ट्युनिशिया
 1 रुग्ण
युक्रेन
 1 रुग्ण
संदर्भ जागतिक आरोग्य संघटना↗ (वर दिलेली आकडेवारी हि ४ मार्च २०२० पर्यंतची आहे)

किती लोकांचा मृत्यू झाला?

सध्याची जागतिक आरोग्य संघटना (WHO) ची आकडेवारी पाहता संपूर्ण जगात ९३,०६२ लोकांना कोरोनाची लागण झाली व ३,१९८ लोकांचा मृत्यू झाला. तसेच एकूण ७६ देशांमध्ये याचे रुग्ण आढळले आहेत. इथे महत्वाची बाब म्हणजे हा रोग ९३,०६२ लोकांना झाला व त्यातील ३,१९८ लोक मृत्युमुखी पडले याचा अर्थ असा होत नाही कि ज्याला कोरोनाची लागण होते तो व्यक्ती मृत्युमुखी पडतोच. जेवढे लोक मृत्युमुखी पडले त्यापेक्षा जास्त लोक या रोगापासून सुखरूप बरे झाले देखील.

राजस्थान मधील जयपूर या ठिकाणी इटलीहून 21 लोक आले होते त्यातील 16 इटालियन लोकांना व एक भारतीय ड्रायव्हरला कोरोना असल्याची चाचणी पॉझिटिव्ह निघाली.


भारतातील कोणत्या राज्यात किती रुग्ण आढळून आले?संदर्भ↗

 • दिल्लीः 1
 • आग्रा: 6 ( दिल्लीतील कोरोना ग्रसित रुग्णाचे आग्र्यातील हे 6 पाहुणे होते ज्यांना कोरोना झाला.)
 • तेलंगणा: 1
 • केरळ: 3 (हे तिन्ही लोक या आजारातून बरे देखील झाले)
 • जयपूर: 17 (16 इटालियन आणि एक भारतीय ड्रायव्हर)
सोशल मीडियावर प्रसारित होणाऱ्या कोणत्याही अफवांच्या बळी पडू नका. अधिक माहितीसाठी WHO चे अधिकृत संकेतस्थळ पहा. 

तसे पहिले तर महाराष्ट्रातील लोकांनां काळजी करण्यासारखे काहीच कारण नाही. कोरोना हा व्हायरस त्याच लोकांना ग्रासतो जी लोक त्याच्या संपर्कात आलेली असतील. उदाहणार्थ बाहेरच्या देशांमधून  आलेले लोक. अश्या लोकांच्या संपर्कात जाणे महिनाभर तरी टाळावे हाच सध्या ह्या व्हायरस पासून वाचण्याचा उपाय आहे.

Read More:
1 टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने